पुणे : गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असल्याने राजकीय कार्यकर्ते आणि नेते निवडणुकीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
रविवारी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रत्येक प्रभागात तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असल्याचे संकेतही त्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात, तर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 अखेरीस महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.
“दिवाळीनंतर महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुढील पाच महिने पक्ष संघटन बळकट करण्यावर भर द्या. प्रत्येक प्रभाग आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधा, कार्यक्रमांचे आयोजन करा आणि बूथ स्तरावर नियोजन करा”, असे अजित पवार म्हणाले आहे.
निवडणुका वेळेवर होतील, त्यामुळे नियोजनपूर्वक आणि एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “जुने आणि नवे कार्यकर्ते एकत्र आल्यास पक्षाला निवडणुकीत यश मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या कामगिरीवर स्वतः लक्ष ठेवणार असून, ऑगस्ट 2025 मध्ये आढावा बैठक घेणार आहे’, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीसाठी उत्साह संचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय