पुणे : पुणे महापालिकेने खेळाच्या मैदानांवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी नाकारली असतानाही, सणस मैदान परिसरात काही पथकांनी अनधिकृतपणे मुख्य प्रवेशद्वार, पाण्याच्या टाकी आणि मैदानावर शेड उभारून सराव सुरू केल्याचा आरोप आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत स्पष्ट केले की, कोणत्याही पथकाला परवानगी देण्यात आलेली नाही आणि पाहणी करून कारवाई केली जाईल.
सध्या शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. नदीपात्रालगतच्या मोकळ्या जागा, घाट, तसेच शहर आणि उपनगरांतील मोकळ्या व बंदिस्त जागांमध्ये सराव होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सारसबागेजवळील सणस मैदानातील मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डी मैदान आणि सिंथेटिक ट्रॅकजवळील पाण्याच्या टाकीवर ढोल पथकांचा सराव होत होता.
मात्र, यंदा महापालिकेने या ठिकाणी सरावास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा विभागाने सणस मैदानातील ६, नेहरू स्टेडियम परिसरातील ४, घोरपडी येथील सप्तगिरी बालाजी क्रीडांगणातील १ आणि हडपसर येथील माळवाडी हँडबॉल स्टेडियममधील १ अशा एकूण १२ प्रस्तावांना नकार दिला. तसेच, सांस्कृतिक विभागानेही गणेश कला क्रीडा मंच परिसरात ढोल वादनासाठी परवानगी देण्यास असमर्थता दर्शविली.
‘गणेशोत्सवातील ढोल पथकांचे महत्त्व लक्षात घेऊन सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, मैदानांवर कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. कोणाला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी परवानगी दिली जाईल,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र, महापालिकेच्या परवानगीची वाट न पाहता गुरुवारी सकाळपासून सणस मैदान परिसरात ढोल पथकांनी सरावासाठी शेड टाकण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-गे डेटींग ॲपवर ओळख, पहिल्याच भेटीत शरीरसंबध अन्…पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
-१७ दिवसांनी मिळणार सोन्याचा हंडा, पण निघाली…; सुसंस्कृत पुण्यात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा
-बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-‘बावनकुळे काटेचे गॉडफादर’, प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेत दाखवला ‘तो’ व्हिडीओ