पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अनुभव घेण्यासाठी, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. आज सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित देखील केले. ही यात्रा भारत गौरव यात्री रेल्वे अंतर्गत आज सोमवारी ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक विशेष भारत गौरव ट्रेन प्रवास सुरू केला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत, या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’ सुरू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाचा जागर करणार्या सांकृतिक आणि देशगौरवशाली यात्रेचा शुभारंभ!🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी… pic.twitter.com/5G1AekZMdv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 9, 2025
या ट्रेनमधून ७०० हून अधिक यात्री प्रवास करत आहेत. गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सर्व भागातील प्रवाशांचा यात सहभाग आहे. या प्रवाशांना शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळणार आहे. रायगड, प्रतापगड, लाल महाल असेल किंवा शिवसृष्टीला ही रेल्वे जाणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे. यासाठी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आयआरसीटीसीनं केली आहे.
यात्रेचा प्रवासमार्ग कसा असणार?
मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई
तिकीट दर काय आहेत?
स्लीपर – १३,१५५
3AC – १९,८४०
2AC – २७,३६५
दिनांक: ९ जून २०२५
५ कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT),
मुंबईप्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे
महत्वाच्या बातम्या
-मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
-काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड
-पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव
-सनी निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना; ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान
-हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच