पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, संरक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार पुढील तीन महिन्यांत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यास सुलभता येईल.
या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. संरक्षण विभागाचे अधिकारी दिल्ली येथून ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले. कांबळे यांनी या विलीनीकरणासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा मुद्दा गतीने पुढे सरकला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या या कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासारख्या सुविधांसाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केली होती. विलीनीकरणानंतर या समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पुणे शहराच्या एकूण विकासाला चालना मिळेल, असे कांबळे यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक
-आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा
-पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर