पुणे : संभाजीनगर येथील एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान कोथरूड पोलिसांनी तिघा मुलींना विनाकारण डांबून ठेवल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पुण्यात राहणाऱ्या ३ मुलींनी केला आहे. या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत या मुलींनी पुणे पोलिस आयुक्तालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता आणि मुलींच्या आरोपात तथ्य नसल्याचेही म्हटले होते.
कोथरूड पोलिसांवर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपासंदर्भात संबंधित मुलींच्या ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता माध्यमांच्या हाती लागला आहे. या अहवालानुसार, मुलींना कोणतीही किरकोळ किंवा गंभीर जखम झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे मुलींनी केलेल्या मारहाणीच्या आरोपात तथ्य नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या अहवालामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या तरुणी स्वतः ससून रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. या तरुणींनी आरोप केला आहे की, कोथरूड पोलीस ठाण्यातील एका वरच्या खोलीत त्यांचा सुमारे चार तास छळ झाला. यावेळी पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक शेरेबाजी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, पोलिसांनी त्यांच्यावर धावून जाऊन गालावर, पाठीवर चापट्या मारल्या आणि कमरेवर तसेच पायावर लाथा मारल्याचा दावाही या तरुणींनी तक्रारीत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
-मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी