पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील रेव्ह पार्टाता मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना खराडीतील एका रेव्ह पार्टीमध्ये टाकेलेल्या छाप्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंकडून जावयाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणी आज एकनाथ खडसेंनी विधीज्ञ असिम सरोदेंची भेट घेतली आहे. असिम सरोदेंनी एकनाथ खडसेंसोबतचा फोटो पोस्ट करत दंड थोपटले आहे.
NDPS कायदा आणि डॉ प्रांजल यांच्या केसबाबत एकनाथ खडसे साहेबांसोबत चर्चा झाली.पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या आहेत. काही लोकांना ‘आरोपी’ म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार, असे म्हणत असिम सरोदे यांनी पोलिसांना इशारा दिला आहे.
एकनाथ खडसेंची पोस्ट
डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे?, अशी सोशल मीडिया पोस्ट करत एकनाथ खडसेंनी सवाल उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
-पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
-अमली पदार्थ अन् विदेशी मद्य, पोलिसांच्या छाप्यात खडसेंच्या जावई जाळ्यात, नेमकं काय घडलं?
-अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित