पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रविण गायकवाड यांनी बावनकुळे यांचे दीपक काटेबद्दलचे काही व्हिडिओ दाखवले. तसेच, अक्कलकोट येथील कार्यक्रमाचे आयोजक जनमजेय भोसले यांच्याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली.
दीपक काटे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे. त्याच्यावर स्वत:च्या भावाची हत्या आणि खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याला कोणत्याही अडथळ्याविना भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीसपद देण्यात आले आहे. काटे हा नेहमीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दिसतो. त्यामुळे दीपक काटे आणि त्याच्यासारख्या इतर गुन्हेगारांना शिक्षा होईल किंवा त्यांच्यावर मकोका लावला जाईल, यावर माझा विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी ढाकणे हा बावनकुळेंचा नातेवाईक आहे. हा हल्ला नियोजनबद्ध होता, असा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केला.
प्रविण गायकवाड म्हणाले, “जनमजेय भोसले यांना माझा सत्कार व्हावा अशी इच्छा होती. हा सत्कार पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते होणार होता. मात्र, खेडेकर कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मी माझ्या कुटुंबासह तिथे गेलो होतो. तिथे पोहोचताच माझ्यावर हल्ला झाला. मी कारमध्ये बसलो असताना दीपक काटेने माझ्यावर हल्ला केला. जनमजेय भोसले यांचा सत्कार कार्यक्रम झाला, पण तिथे कोणताही निषेध नोंदवला गेला नाही. आयोजकांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मी तिथे चार ते पाच तास होतो.”
“भाजपच्या पीआर कंपनीने हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड करून बातमी व्हायरल केली. याचा अर्थ काय? मी जिवंत आहे, हे समाजाच्या प्रेमामुळे. दीपक काटे हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वत:च्या भावाची हत्या आणि खंडणीचे आरोप आहेत. तरीही त्याला भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीसपद देण्यात आले. पुणे विमानतळावर काटेकडे दोन पिस्तुले आणि २८ काडतुसे सापडली. त्याला अटक झाली, पण न्यायालयात त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ठेवली गेली नाही. ती ठेवली असती तर काटे जामिनावर सुटला नसता. त्याच्यावर मकोका लावून त्याला तुरुंगात डांबायला हवे होते. काटे हा एक हस्तक आहे,” असे गायकवाड यांनी सांगितले.
गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ दाखवला, ज्यात बावनकुळे म्हणतात, “मला दीपकअण्णाचा अभिमान आहे. त्याला कुणी गुन्हेगार ठरवले होते. मागील सरकारने त्याच्यावर अन्याय केला. मी दीपकला सांगितले होते की, काळजी करू नको, मी आणि देवेंद्रजी तुझ्या पाठीशी आहोत. दीपक काटेला एक कार्यक्रम देण्यात आला होता. आमची पुरोगामी विचारधारा भाजपला धोकादायक वाटते. भाजपने दोन पक्ष फोडले आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. पुरोगामी कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यावर आता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार?” असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.
“देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खोटे बोलले. ते म्हणाले, ‘मी सहकार्य केले नाही का?’ पण माझी तक्रार नोंदवली गेली नाही. हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या संघटना संपवण्याची योजना आखली गेली आहे. माझ्यावर खूनी हल्ला झाला, पण गुन्हेगारांना शिक्षा होईल किंवा मकोका लावला जाईल, यावर माझा विश्वास नाही. तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळेंचा नातेवाईक आहे. हे सगळे नियोजनबद्ध होते,” असा आरोप गायकवाड यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
-लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
-हनी ट्रॅप जाळ्यात आजी माजी मंत्री; महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार
-तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंडांकडून बेदम मारहाण
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
-अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?