पुणे : पुण्यातील गणेशोत्सव हा गणेशभक्तांसाठी एक खास उत्सव आहे. पुण्यातील हा गणेशोत्सवात देश-विदेशातून लोक मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी सामील होतात. यंदा ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘यावर्षी पारंपरिक वाद्यांमुळे कोणत्याही पथकांवर खटले दाखल केले जाणार नाहीत’, असा निर्णय पुणे पोलिसांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवातील सांस्कृतिक रंगत आणखी वाढणार आहे.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रच्या वाद्यपूजन कार्यक्रमात पुणे पोलिसांनी हा स्वागतार्ह निर्णय जाहीर केला. मात्र, पथकांनी रात्री १० वाजेपर्यंत सराव पूर्ण करावा, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. या नियमांचे पालन केल्यास उत्सवातील उत्साह आणि शिस्त दोन्ही टिकून राहतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र, साताऱ्यातील परिस्थिती वेगळी आहे. तिथे काही नागरिकांनी सरावादरम्यान आवाजाच्या तक्रारी केल्याने पोलिसांनी ढोल-ताशा पथकांना नोटीसा बजावल्या आहेत. पथकांना निर्जन ठिकाणी सराव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पारंपरिक वाद्ये सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असून, त्यांना कायद्याच्या चौकटीत जपणे गरजेचे आहे. पुणे पोलिसांचा निर्णय कौतुकास्पद असला तरी इतर ठिकाणी अडथळे कायम असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक
-आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा