Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?

by News Desk
April 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Gopichand Padalkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतनिमित्त पुण्यात होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमावरुन आता वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमास बोलवणार नसल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. यावरुनच महायुतीत वादाची ठिणगी पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती.’पडळकर हे शेख चिल्ली असल्याचे सूरज चव्हाण यांनी म्हणाले होते. आता, गोपीचंद पडळकर यांनी सूरज चव्हाण यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. टया बिनडोक लोकांना माहिती नाही मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती’, अशा शब्दात पडळकरांनी पलटवार केला आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

सूरज चव्हाण काय म्हणाले?

“गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता, तसा हा शेखचिल्ली महायुतीमधील नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित आहे की, पवारांना विरोध केला तरंच राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केटमध्ये किंमत झिरो आहे. अजित पवारांनी अनेक भाषणामध्ये अनेकदा सांगितलंय की, पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी, राजकीय पार्श्वभूमी चोरी, दरोडेखोरीची नसावी. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत पडळकरांनी केली नसावी”, असा सणसणीत टोला सूरज चव्हाण यांनी लगावला होता.

अजित दादा पवार यांनी अनेक भाषणामध्ये अनेक वेळा सांगितले आहे पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी,राजकीय पार्श्वभूमी चोरी,दरोडेखोरीची नसावी गोपीचंद पडळकरला स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला…

— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) April 17, 2025

गोपीचंद पडळकरांचा पलटवार

“मी धनगराचा पोरगा आहे, मला असल्या चोऱ्या-माऱ्या करायची गरज नाही. प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा मी बोलतो तेव्हा पोलीस, तहसीलदार असे प्रशासन वापरण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नसतो. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा आमचा विषय आहे, आम्ही ठरवू काय करायचं ते. तुमचे एवढे कार्यक्रम होतात आम्ही बोलतो का? हा समाजाचा विषय आहे, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवावं तर तुम्हाला पण बोलवू”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

“हे मला दरोडेखोर म्हणतात, मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगळ राष्ट्रवादीचेच काम आहे. माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार २००९ साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप आहे, असंही पडळकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन महायुतीमधील वाद शमणार की उफाळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देखील प्रतिक्रियांंकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! ३ टर्म आमदार राहिलेला बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार? मुहूर्तही ठरला!

-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस

-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?

-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल

Tags: ajit pawarGopichand PadalkarNationalist Congress PartyncpSuraj Chavanअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससूरज चव्हाण
Previous Post

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! ३ टर्म आमदार राहिलेला बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार? मुहूर्तही ठरला!

Next Post

स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Swargate

स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा 'तो' दावा फोल

Recommended

शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

April 12, 2024
Ravindra Dhangekar

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहिण योजने’चा विधानसभा निवडणुकीत धंगेकर घेणार फायदा? मतदारसंघात केली पोस्टरबाजी

July 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved