Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘त्यांनी शरद पवारांवर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’; शहांच्या ‘त्या’ टीकेवर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

by News Desk
January 13, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Amit Shah and Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील भाजप आणि आरएसएस संघाचं कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १२ जानेवारी (रविवारी) शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनामधअये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले अमित शहा?

“महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केलं. या राजकारणाला जनतेने 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम केलं. तर उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये आपल्यासोबत विश्वासघात केला. जनतेने त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता आपल्यासोबतच खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला आहे.”, असे अमित शहा म्हणाले. अमित शहा यांच्या या टीकेला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सणसणीत उत्तर दिलं आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली. मात्र, गेल्या काही वर्षातील भाजपच राजकारण पाहिलं तर देश भरामध्ये अमित शहांनी पक्ष फोडाफोडीचे काम केलं आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी दोन पक्ष फोडले असून त्यांचे चिन्ह आणि नाव चोरण्याचा प्रयत्न केला आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

‘घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता’

‘इतर राज्यातही राजकारणाची संस्कृती संपवण्याचे काम अमित शहांनी केलं. अमित शहांच्या जीवनावर जेव्हा केव्हा पुस्तक लिहिण्यात येईल तेव्हा देशातील सर्वात मोठा फोडाफोडीचा जनक आणि घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून त्यांची ओळख सांगितली जाईल, अशा शब्दातही प्रशांत जगताप यांनी अमित शहांवर शरसंधान साधलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…

-वाल्मिक कराड-राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल; अजितदादा म्हणाले, ‘नवा गडी फोटो काढून जातो अन् वाटच लागते’

-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं

-ठाकरेसेना स्वबळावर लढणार; ‘हा तर शिवसैनिकांचा विश्वासघात’

-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना

Tags: Amit Shahbjpncpsharad pawarshivsenaUddhav Thackeray
Previous Post

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…

Next Post

पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला ‘तो’ फोन

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Laxman Hake

पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला 'तो' फोन

Recommended

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची बारामतीत विराट सभा; राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, नेत्यांसह जनसन्मान महामेळावा

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची बारामतीत विराट सभा; राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, नेत्यांसह जनसन्मान महामेळावा

July 14, 2024
संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’

संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’

June 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved