पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे आज (बुधवार, 16 जुलै 2025) पहाटे पुण्यातील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. डॉ. टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलपती होते आणि अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य केले.
आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील केसरी वाड्यात ठेवण्यात येईल. दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र काँग्रेस नेते रोहित टिळक, कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
महत्वाच्या बातम्या
-हनी ट्रॅप जाळ्यात आजी माजी मंत्री; महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार
-तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंडांकडून बेदम मारहाण
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
-अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’