Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं

by News Desk
February 6, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण, विधानसभा
mahesh landge and Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या कार्यक्रमामध्ये महायुतीतील २ पक्षातील दादांमध्ये तुफान टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केला आणि शेलक्या शब्दांमध्ये अजित पवारांनी महेश लांडगे यांना सुनावल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच हा पॉलिटिकल ड्रामा पहायला मिळाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं, पण अजित पवारांचं नाव घेणं टाळलं. पिंपरी चिंचवडच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं महेश लांडगे म्हणाले. मात्र, त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या पिंपरी चिंचवडच्या विकासाबद्दल लांडगे काहीच बोलले नाहीत. यामुळे अजित पवारांनी त्यांच्या भाषणावेळी महेश लांडगेंना शहरात केलेल्या कामांची आठवण करुन दिली.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

आमदार महेश लांडगे काय म्हणाले?

“पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तायाला मंजुरी दिली आणि आज ते पुन्हा मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन सुद्धा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या खाली कुठेतरी लपल्यासारखी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण झालं आहे.”

“मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे. म्हणजे तुम्ही करणार असाल तर मी सांगतो माझा तसा काही उद्देश नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विभाजन करायचं झालं तर एका जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं ही माझी विनंती”, असे महेश लांडगे म्हणाले.

अजित पवारांनी महेश लांडगेंना सुनावलं

“आता महेशने सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला, मला माहिती नाही. परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे, १९९२ला मी तुमचा खासदार झालो १९९२ ते २०१७ कोणी पिंपरी चिंचवड सुधारवलं? आज २५ वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार है ज्याने केले, त्याला त्याच क्रेडिट देत असतो.”

“कुणीतरी बातम्या उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार. मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका”, असा दम देखील अजित पवारांनी भरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम

-‘माझी लाडाची पिनू..’ म्हणत शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द

-इंदौरच्या धर्तीवर होणार कसब्यातील स्वच्छता नियोजन, पालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी अन् कार्यकर्ते अभ्यास दौऱ्यावर

-मतदारसंघातील स्थानिक कामांसाठी चंद्रकांत पाटलांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, दोन्ही दादांमध्ये काय चर्चा झाली?

-शिंदेंच्या ‘मिशन पुणे’ला ठाकरे देणार टक्कर; पुण्यासाठी आखला खास प्लान, नाराजांना रोखण्यात यश येणार?

Tags: ajit pawarbjpDevendra FadnavisMahesh LandgencpPimpri Chinchwadअजित पवारदेवेंद्र फडणवीसपिंपरी चिंचवडपुणेपोलीस आयुक्तालयभाजपमहेश लांडगेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम

Next Post

‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Ajit Pawar

'महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर...'; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?

Recommended

Ladki Bahin

‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज

February 2, 2025
Vasant More

कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्…; मोरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

January 23, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved