Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

चंद्रकांत पाटलांना सर्व स्तरातून व्यापक जनसमर्थन; विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा महायुतीचा निर्धार

by News Desk
November 19, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवट सोमवारी झाला. चंद्रकांत पाटलांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेले महिनाभर सुरु असलेला प्रचार सोमवारी समाप्त झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान सर्वच स्तरातून चंद्रकांत पाटलांना व्यापक जनसमर्थन मिळाले.

विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून भाजप महायुतीने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले‌. ठिकठिकाणी कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटीगाठी, बाईक रॅली आदींच्या माध्यमातून जोरदार प्रचार झाला. प्रत्येक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून मंडल स्तरापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता चंद्रकांत पाटलांच्या प्रचारार्थ झोकून देऊन काम करत होता.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

विविध सोसायट्यांमधील यांच्या संपर्क अभियानात ही अनेक नागरिक चंद्रकांत पाटील यांना भेटून विजयासाठी शुभेच्छा देत होते. रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी ‘दादा तू कोथरुड मधून दणक्यात निवडून येणार’ अशा शब्दांत आशीर्वाद दिले. तर सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी ‘दादा तुम्ही मंत्री असूनही आमच्यातलेच वाटता अशी भावना व्यक्त करत आपला पाठिंबा दिला. त्यासोबतच प्रचाराच्या समारोपप्रसंगी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादांना जास्तीत जास्त मतदान करण्याची कमिटमेंट दिली.

वस्ती भागातूनही चंद्रकांत पाटलांना उत्स्फूर्त मिळाल्याचे चित्र होते. बाईक रॅलीदरम्यान गणेश मंडळांकडून फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले. तर अनेक महिलांनी दादांचे आनंदाने औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. यामध्ये चंद्रकांतदादांनी वस्ती भागातील महिलांसाठी पाच वर्षांत केलेल्या कामांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

चंद्रकांत पाटलांसाठी मुळशीकरांची वज्रमूठ

कोथरूड मतदारसंघात मुळशीकर नागरीक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्याने तसेच, मुळशीचे सुपूत्र असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्री पदापर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यासोबतच पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात मुळशी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने मुळशीकरांनी आपली संपूर्ण ताकद दादांच्या पाठिशी उभी करण्याचा निर्धार मुळशीकरांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

ब्राह्मण समाजही चंद्रकांतदादांच्या पाठिशी

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजनेही चंद्रकांत पाटील यांच्याच पाठिशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय; प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी आणि चंद्रकांत पाटलांनी समाजातील विविध शाखांसाठी गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून सढळ हाताने केलेली मदत आदींमुळे कोथरुड मधील ब्राह्मण समाज चंद्रकांत पाटलांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

टेकडी बचाव कृती समितीचा गैरसमज दूर

बालभारती-पौड रस्तामुळे टेकडीवर जाणारे अनेक नागरिक संभ्रमात होते. त्यामुळे टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांनी ‘वोट फॉर टेकडी’चा नारा दिला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी स्वतः एआरएआय टेकडीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच, कोर्टाचा निकाल रस्त्याच्या बाजूने असूनही पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याची माहिती दिली. त्यावर टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांकडून आनंद व्यक्त करत दादांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे १० जून २०२४ रोजीच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील टेकड्यांवर ६५ हजार वृक्ष संवर्धनाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

एकंदरीत चंद्रकांत पाटलांनी प्रचारा घेतलेली आघाडी; वाढता प्रतिसाद यांसह विविध कारणांमुळे ही निवडणूक चंद्रकांत पाटलांसाठी एकतर्फी असल्याचे चित्र होते. माध्यमांकडूनही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही चंद्रकांत पाटील हे विक्रमी मतांनी विजयी होतील, असा अंदाज ही व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?

-टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना जाण्यापासून अडवलं; अजित पवार म्हणाले, ”काकी माझ्या…’

-‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा

-मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी! ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्या पक्षाला मोठं करा! मोहोळांचं आवाहन

-‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही

Tags: bjpChandrakant PatilKothrudpuneकोथरुडचंद्रकांत पाटीलभाजप
Previous Post

पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?

Next Post

महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Hemant Rasane

महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात

Recommended

Maharashtra Election

विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल

October 22, 2024
ठरलं! पुण्यातून भाजपची उमेदवारी मुरलीधर मोहोळांनाच; भाजपने जाहीर केली दुसरी यादी

ठरलं! पुण्यातून भाजपची उमेदवारी मुरलीधर मोहोळांनाच; भाजपने जाहीर केली दुसरी यादी

March 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved