पुणे : भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना एका व्यक्तीने अश्लिल मेसेज कॉल करुन त्रास देणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून हा पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता.
या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आहे.
आरोपी अमोल काळे याने पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आहे.
एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.
महत्वाच्या बातम्या
-मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा
-उन्हाच्या कडाक्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार
-आता गुपचूप लॉजवर जाणं झालं अवघड; पोलिसांच्या लॉज मालकांना ‘या’ महत्वाच्या सूचना
-वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी
-PMRDA: हजारो शेतकऱ्यांची फसवणूक अन् ३ हजार कोटींचा घोटाळा? विकास आराखड्याचे गौडबंगाल काय?