Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या

by News Desk
December 19, 2024
in Pune, पुणे शहर
Sania Siddique
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला ४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणि जिच्यामुळे तब्बल ६ पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं होतं ती गुडिया उर्फ सानिया सिद्दिकीला पुणे पोलिसांनी आता बिहारमधून अटक केली आहे. पुणे पोलीस दलातील जिगरबाज महिला पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या टीमने बिहारमध्ये वेषांतर करुन सापळा रचला आणि सानियाला बेड्या ठोकल्या.

अवघ्या २३ वर्षाच्या सानिया सिद्दिकी या तरुणीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा नंबर वापरत तिने स्वतः बोलत असल्याचा भासवलं आणि कंपनीच्या अकाउंटंटकडून तब्बल ४ कोटी रुपये उकळले होते. अकाउंटंट यांनी विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाउंटवर ४ कोटी रुपये पाठवले. या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते. मात्र, पुण्यात येत असताना तिने पोलिसांना चकवा देत पळ काढला. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

६ पोलिसांना निलंबित केल्यानंतर या गुडिया उर्फ सानियाला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली. ‘आमच्या टीमने बिहारच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन, वेषांतर करून मोठा जिकिरीने अखेर गुडियाला बेड्या ठोकल्या आणि तिला आम्ही पुण्यात घेऊन आलो’, असे पोलीस निरिक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले आहे.

बिहारमधील गोपालगंज भागातील काही स्थानिक पत्रकारांना माहिती घेण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोपालगंज येथे एका शेतात ती राहत असलेल्या घराबाहेर सापळा रचून सानियाला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला पुण्यात आणलं, असे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले आहे. आरोपी गुडिया सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून तिने आणखी कोणाची फसवणूक केली? तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे? याबाबतचा अधित तपास पुणे पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार

-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान

-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ

-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार

-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?

Tags: BiharCyber ​​Crimepune policeSania Siddiqueपुणेपुणे पोलीसबिहारसायबर गुन्हे
Previous Post

‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार

Next Post

मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Murlidhar Mohol And Narendra Modi

मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'कार्यकर्त्याला आणखी काय हवं'

Recommended

‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप

‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप

February 19, 2024
‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी

‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी

May 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved