पुणे : पुण्यातील खराडी परिसरात सुरु असलेल्या एका कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक केली जात होती. ‘मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी’ असे कॉल सेंटरचे नाव असून या ठिकाणाहून ४१ मोबाईल फोन, ६१ लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात संवेदनशील डेटा असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून शंभर ते दीडशे लोकांची चौकशी सुरु आहे. विशेषबाब म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ गुजरातचे असून, मुख्य आरोपी देखील गुजरातचा आहे. हे कॉल सेंटर संपूर्णपणे गुजरातच्या लोकांकडून चालवले जात होते.
डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा प्रकार आहे. यात फसवणूक करणारे स्वतःला अमेरिकेतील पोलिस किंवा अन्य कायदेशीर संस्था असल्याचे भासवतात. ते पीडित व्यक्तीला त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यासाठी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येणार आहे. या अटकेपासून वाचण्यासाठी त्यांना त्वरित पैसे भरावे लागतील, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भीती दाखवून पैसे उकळले जातात.
हे कॉल सेंटर अमेरिकेतील नागरिकांना अशाच प्रकारे कॉल करून त्यांना घाबरवत होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होते. अनेक नागरिकांचे वैयक्तिक डेटा, सोशल सिक्युरिटी नंबर, आणि बँक डिटेल्स मिळवून त्याचा गैरवापर केला जात होता. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-खासदार मुरलीधर मोहोळ घेणार कसब्यात जनता दरबार, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
-वैष्णवीला दिलेले 51 तोळे स्त्री धन कुठे गेलं? धक्कादायक माहिती समोर
-वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत नणंदबाई ‘पिंकी ताई‘ची हवा; बड्या नेत्यांसोबत कनेक्शन आले पुढे
-वैष्णवी हगवणे: हगवणेंचं कोणीही वकिलपत्र घेऊ नका; रोहिणी खडसेंचं आवाहन
-हगवणे कुटुंबात ढवळाढवळ करणारा, प्रत्येक वादात नाव असणारा निलेश चव्हाण नेमका कोण?