पुणे : राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच ठाकरे बंधू देखील एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे-राज ठाकरे या नेत्यांच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच पुण्यात एकाच बॅनरवर आदित्य-राज ठाकरेंचे एकत्र फोटो पाहायला मिळाले. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शहरात आदित्य आणि राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनर लावले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी शहरात हे बॅनर लावले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस हा १३ जून तर राज ठाकरेंचा वाढदिवस हा १४ जून रोजी असतो. या निमित्ताने ठाकरेंच्या पदाधिकार्याने दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे एकच बॅनर लावले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चेमध्ये उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे सकारात्मकता पहायला मिळाली आहे. एका आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते एकत्र पहायला मिळाले होते. या आंदोलनाबाबत बोलताना राज ठाकरेंनी देखील एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असल्याचं सांगितलं होतं.
आता चर्चा नाही तर थेट बातमी देऊ, असं सकारात्मक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्याचे स्पष्ट दिसत असून आता बॅनरवरुन कार्यकर्त्यांचं देखील मनोमिलन झाल्याचं पहायला मिळत आहे. जर खरंच ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात नवी राजकीय घडामोड पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?
-मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
-काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड
-पर्यटकांनो पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना काळजी घ्या! भूशी डॅममध्ये दोघा मित्रांनी गमावला जीव
-सनी निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना; ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान