पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन गावात एक हृदयद्रावक घटना घडली. पती-पत्नीच्या भांडणात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा त्रिशूळ लागून मृत्यू झाला. अवधूत सचिन मेंगावडे (वय ११ महिने) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी पती नितीन अजिनाथ मेंगावडे आणि पत्नी पल्लवी नितीन मेंगावडे यांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पती आणि पत्नी या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. भांडण सोडण्यासाठी भावजय गेली होती. त्यावेळी तिच्या कडेवर ११ महिन्यांचं बाळ होतं. त्या भांडणा दरम्यान पत्नीने पतीवर त्रिशूळ फेकून मारले आणि ते त्रिशूळ ११ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घुसल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोपी पल्लवी नितीन मेंगावडे आणि आरोपी नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पुनर्वसन या गावातील आरोपी पल्लवी नितीन मेंगावडे आणि आरोपी नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांमध्ये सातत्याने क्षुल्लक कारणावरून भांडणं व्हायची, गुरुवारी देखील त्या पती पत्नीमध्ये भांडण झाली. त्या दोघांची भांडण भावजय भाग्यश्री सचिन मेंगावडे या सोडवायला गेल्या. त्यावेळी त्यांच्या कडेवर ११ महिन्यांचा अवधूत होता. त्याच दरम्यान आरोपी पत्नी पल्लवी यांनी आरोपी पती नितीन यांना घरात असलेला त्रिशूळ फेकून मारला असता, तो त्रिशूळ भावजय भाग्यश्री यांच्या कडेवर असलेल्या ११ महिन्यांच्या अवधूतच्या डोक्यात घुसला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. अवधूतला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, ११ महिन्यांच्या बाळाची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले. असं असली तरी पोलिसांना वेगळाच संशय येतोय. हा प्रकार कोणत्या अंधश्रद्धेतून घडला आहे का या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक
-आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा