पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्यातील अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा समावेश जास्त होता. माळशिरस मतदारसंघात विजयी झालेले आमदार उत्तम जानकर यांनी मरकडवाडी गावात लोकांनी आपल्याला मतदान केल्याचा दावा केला, परंतु ईव्हीएममुळे ती मते आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. या मुद्द्यामुळे वातावरण तापले होते.
आज पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणी सुरू आहे. सकाळी 11 वाजता ईव्हीएम पडताळणीला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. खडकवासला मतदारसंघात भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी 1 लाख 61 हजार मते मिळवून विजय मिळवला, तर सचिन दोडके यांना 1 लाख 10 हजार मते मिळाली. दोडके यांनी दोन ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, विधानसभेच्या वेळी नोव्हेंबर 2024ला झालेल्या मतदानावेळचं मतदान आणि व्हीव्हीपॅट स्लिप अशी पडताळणी करावी आणि यासाठीच आम्ही पैसे भरलेत. मात्र प्रत्यक्षात आज दोन ईव्हीएम मशीनमध्ये 1400 मतं नोंदवली जातायेत, ती मतं आणि व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. म्हणूनच दोडकेंनी आक्षेप नोंदवले आहेत, त्यामुळे पडताळणी थांबवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-दारुचे १० रुपये कमी दिले म्हणून डोक्यात फोडली बिअरची बाटली, व्हिडीओ व्हायरल झाला अन्….
-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘महारक्तदान शिबिर’; १०१४ युनिट रक्त संकलित
-अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा प्रताप; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नेमकं काय प्रकरण?
-पत्नीला शेजारची सीट नाही दिली म्हणून भाजप पदाधिकाऱ्याने थेट केंद्रीय राज्यमंत्र्याकडे केली तक्रार