पुणे : कोथरुड पोलीस ठाण्यात तीन तरुणींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित तरुणींनी केला आहे. या प्रकरणाने आता मोठे वादळ निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील एक विवाहित महिला सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील कोथरुड येथे राहणाऱ्या आपल्या तीन मैत्रिणींकडे एका दिवसासाठी आली होती. या महिलेची हरवल्याची तक्रार संभाजीनगर पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तिचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुड येथे तिचा शोध घेतला. कोथरुडमध्ये ही महिला सापडल्यानंतर पोलिसांनी तिला आश्रय देणाऱ्या तीन तरुणींना संशयित म्हणून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणींसंदर्भात बोलताना त्यांच्याच एका मैत्रिणीने फेसबुक लाईव्ह करत पोलिसांनी विनाकारण ताब्यात घेतलं असल्याचं सांगितलं आहे.
‘तू महार मांगाची आहेस म्हणून असं वागतेस. तुम्ही रां**आहात’, असे पीएसआय प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पीएसआय अमोल कामटे यांनी तरुणांना म्हणत पोलिस स्टेशनमधील एका खोलीत पाच तास डांबून ठेवल्याचा आरोपी देखील श्वेता यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहे.
पीडित तरुणींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला, त्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतले आणि जातीवाचक शब्द वापरून त्यांना मारहाण केली. मात्र, कोथरुड पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून, “तपासादरम्यान केवळ प्रश्न विचारण्यात आले असून कोणतीही मारहाण किंवा अपमान झालेला नाही,” असे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘कोथरुड येथील पोलीस ठाण्यात तीन तरुणींवर जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मला यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हॉट्सॲपवर प्राप्त झाला आहे. जर हे आरोप खरे असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
-ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?