पुणे : पुण्यातल खराडी येथील एका हॉटेलवर 27 जुलै 2025 रोजी पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश आहे. न्यायालयाने पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर दोन महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छापेमारीदरम्यान तीन महिला या ठिकाणाहून पळून गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी मागताना या तीन संशयित महिलांचा शोध घेण्याचे कारण दिले होते. मात्र, तपासात या तीन महिलांचा रेव्ह पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रांजल मनिष खेवलकर (वय 41), निखिल जेठानंद पोपटाणी (वय 35), समीर फकीर महमंद सय्यद (वय 41), सचिन सोनाजी भोंबे (वय 42), श्रीपाद मोहन यादव (वय 27), ईशा देवज्योत सिंग (वय 23), प्राची गोपाल शर्मा (वय 22), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या सात आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. तथापि, कोणी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होईल. पुणे पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
-पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
-रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
-पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
-अमली पदार्थ अन् विदेशी मद्य, पोलिसांच्या छाप्यात खडसेंच्या जावई जाळ्यात, नेमकं काय घडलं?