पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना यांच्या विरोधात आता बीडमधील एका संस्थेने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल तब्बल २८ वेळा बुक केले होते, अशी तक्रार प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तक्रारीत नेमकं काय?
या हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकरांनी अनेक वेळा मुलींना बोलावलं असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २८ वेळा रूम बुक करणे हा संगठीत रॅकेटचा भाग असू शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली. महिला आयोगाने या आर्जनानंतर पुणे पोलीस करत असलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदाराने अर्जात, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी श्री. प्रांजल खेवलकर यांनी २८ वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा..१/२
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 5, 2025
प्रांजल खेवलकर यांना त्यांच्या चार मित्र आणि दोन महिलांसह शनिवारी पहाटे खरडीत पार्टी करताना अटक करण्यात आली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
महत्वाच्या बातम्या
-सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
-मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी