पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहरात किरकोळ कारणांवरून मारहाण, कोयत्याचा धाक दाखवून लूटमार अशा अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. अशातच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करून “ऑनलाइन पैसे टाकतो, कॅश द्या” असे सांगत पैसे उकळण्याचा आणि नंतर बदनामीची धमकी देऊन लूटमार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमका प्रकार काय?
बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पैसे उकळण्याचा प्रकार नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी फिर्यादी बुधवार पेठेत गेला असताना त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचले.
“आम्हाला 20 हजार रुपये ऑनलाइन देऊ,” असे सांगत कॅश मागितले आणि नकार दिल्यास “तुम्ही बुधवार पेठेत गेल्याची बदनामी करू,” अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पोलिस हेल्पलाइनवर कॉल करून फिर्यादीने 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची खोटी तक्रार देण्यास सुरुवात केली. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की हे दोन आरोपी फिर्यादीची फसवणूक करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण या दोन्ही आरोपींना अटक केली.
महत्वाच्या बातम्या
-‘बावनकुळे काटेचे गॉडफादर’, प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेत दाखवला ‘तो’ व्हिडीओ
-लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
-हनी ट्रॅप जाळ्यात आजी माजी मंत्री; महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार
-तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंडांकडून बेदम मारहाण
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद