Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

'एकच मिशन, पुणे नंबर वन' हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार

by News Desk
February 27, 2024
in Pune, पुणे शहर
‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली.

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले. प्रसंगी ऍड. मंदार जोशी, अमित जाधव, ऍड. एन. डी. साबळे, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “माझा जन्म नारायण पेठेतला असून, बालपण व माझी कारकीर्द पुण्यात बहरली आहे. पुणे शहराच्या समस्यांची मला जाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात फिरत असताना शहराचा सर्वांगीण विकास कसा असायला हवा, याची अनेक आदर्श उदाहरणे पाहिली आहेत. विकासाची ही आदर्श मॉडेल्स आपण पुण्यातही राबवू शकतो. त्याचे सर्व नियोजन आपण करत आहोत. येणाऱ्या काळात पुण्यासाठी चांगले प्रकल्प, उद्योग आणण्यासाठी, तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभेत जाण्याची संधी मिळणे गरजेचे आहे.”

“भाजपसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. तसेच २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ऐनवेळी येवला मतदारसंघातून विधानसभा लढण्याची संधी दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना येवल्यात तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांना तुल्यबळ लढत दिली होती. माझ्यातील लढवय्या नेतृत्व व मला मिळणारा सर्वपक्षीय पाठिंबा यामुळे सर्वच सहा मतदारसंघात आम्हाला मताधिक्य मिळू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्याला पुण्याच्या लोकसभेची उमेदवारी देऊन पुणेकरांच्या सेवेची संधी देईल, असा विश्वास वाटतो,” असे मानकर यांनी नमूद केले.

“पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह मेट्रोचा विस्तार, रिंग रोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ शहर व महापालिकेच्या शाळांचे सक्षमीकरण, पुण्याचा आत्मा असलेल्या मुळा-मुठा नदीचे संवर्धन, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिला, तरुण यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासह इतर अनेक योजनांवर आपण करत आहोत. पुण्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे हजारो कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध असतो. हा सीएसआर निधी, लोकांचा सहभाग यातून अनेक प्रकल्प व उपक्रम मार्गी लावण्यावर आपला भर असणार आहे,” असे मानकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

-शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग

-लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

-“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”

-लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…

Tags: bjpChhagan BhujbalDevendra FadnavisLok Sabha ElectionNarendra ModipuneShivaji MankarYewlaछगन भुजबळदेवेंद्र फडणीवसनरेंद्र मोदीपुणेभाजपयेवलालोकसभा निवडणूकशिवाजी मानकर
Previous Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post

पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

पर्वतीत रस्सीखेच: मिसाळ म्हणतात, शेत सुपीक दिसलं की लोक तुटून पडतात; तर भिमालेंचे जोरदार प्रत्युत्तर

पर्वतीत रस्सीखेच: मिसाळ म्हणतात, शेत सुपीक दिसलं की लोक तुटून पडतात; तर भिमालेंचे जोरदार प्रत्युत्तर

July 19, 2024
बारामतीच्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळेच…’

बारामतीच्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळेच…’

June 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved