Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मतदान करूया अन् एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडूया; सनी निम्हण यांचं आवाहन

by News Desk
November 15, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Sunny Nimhan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते. अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी केलेले हे नियोजन असेल खरे पण इथेच चिंतेची पाल चुकचुकत असल्याचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले आहे.

‘आपल्याकडे मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून तशी तरतूद आहे. पण आपण बघत आलोय की मतदानाला जोडून सुट्टी आली किंवा मतदान विकएंड ला आले की अनेकजण कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला जातात. त्याचा मतदानावर परिणाम होतो आणि विशेषतः शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी होते. यावर पालकांनी दक्ष होऊन विचार करावा म्हणून अनेक शाळांनी मुलांकडून पालकांसाठी भावनिक पत्र लिहून घेतले. त्यात पालकांना जागरूक नागरिक म्हणून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. आता याच शाळा मतदानाआधी दोन दिवस तयारीसाठी सुट्टी देणार असतील तर मग या उपक्रमाचा काय उपयोग?’, असा सावल सनी निम्हण यांनी उपस्थित केला आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

‘यावेळी मतदान विकएंडला न घेता आठवड्याच्या मध्ये वर्किंग डे ला घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विकएंडला जोडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी असेल तर हा हेतू साध्य होईल का? आता तर बाहेर जाण्यासाठी सलग चार दिवसांची सुट्टी असा विचार करून नागरिक बाहेर गेले तर मतदानाचे काय? याचा विचार हे नियोजन करताना व्हायला हवा. अजूनही वेळ गेली नाही. शाळांनी याचा पुन्हा विचार करावा असे एक जागरूक नागरिक म्हणून माझे मत आहे’, असेही सनी निम्हण म्हणाले आहेत.

समजा असे झाले नाही तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सुट्टीच्या नादात राष्ट्रीय कर्तव्याला सुट्टी देऊ नये. आपण सुजाण आहात. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान किती महत्वाचे आहे हे आपण जाणता. चला तर मग सुट्टीचा मोह बाजूला ठेऊया आणि राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देऊया. मतदान करूया आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडूया!, असेही आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

-कोथरुडमध्ये भाजप कार्यकर्ते लागले कामाला; बालेवाडीत लहु बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांसाठी वाटली विक्रमी पत्रके

-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने

-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन

-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?

-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?

Tags: bjppuneShivajinagarSunny Nimhanपुणेभाजपशिवाजीनगरसनी निम्हण
Previous Post

कोथरुडमध्ये भाजप कार्यकर्ते लागले कामाला; बालेवाडीत लहु बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांसाठी वाटली विक्रमी पत्रके

Next Post

असीम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “मला शरद पवार आणि ठाकरेंनी जरांगेंशी बोलायला सांगितलं आणि…”

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Asim Sarode And Sharad Pawar

असीम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले "मला शरद पवार आणि ठाकरेंनी जरांगेंशी बोलायला सांगितलं आणि..."

Recommended

Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत

Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत

May 12, 2024
Swargate

स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल

April 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved