पुणे : पुणे शहरात जेवढ्या गतीने प्रगती करताना दिसत आहे तितकेच शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून शहरात मारहाणीच्या घटना घडल्याचे अनेकदा पहायला मिळते. अशातच सोमवारी सकाळी तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेत काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांना “पोलीस होण्याची तुमची लायकी नाही” अशा अपमानास्पद शब्दांनी हिणवण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तळजाई टेकडीवर दररोज अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक सराव करतात. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सराव करत असताना अचानक १० ते १२ जणांचा एक टोळका तिथे आला. या टोळक्याने सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. धक्कादाायक म्हणजे यामध्ये मुलींचाही समावेश होता. काही विद्यार्थ्यांना मारहाण करताना टोळक्याने त्यांना अपमानास्पद भाषेत धमकावले.
हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांमध्येही या घटनेबाबत संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पीडित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
-अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?
-अजित पवारांनी बारामतीकरांना भरला दम; ‘त्यांना टायरात घालून मारा, तो माझा नातेवाईक का असेना?’
-काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय