Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी

by News Desk
December 20, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी कसब्यातील महत्वाच्या २ समस्या मांडल्या आहेत. रासनेंना पहिल्यांदाच मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी पुरवणी मागण्यासंबंधित चर्चेत बोलताना खडक पोलीस वसाहतीचे पुनर्वसन तसेच २००४ पासून संथ गतीने सुरू असणाऱ्या मामलेदार कचेरीच्या कामाला देखील गती देण्याची मागणी राज्य सरकारला केली आहे.

खडक पोलीस वसाहत १२५ वर्षे जुनी ब्रिटिशकालीन आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करणारे पोलीस या जुन्या वसाहतीतील अडीचशे फुटांच्या दुरावस्थेतील कौलारू निवासस्थानात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तडे गेलेल्या भिंती, तुटक्या खिडक्या, सांडपाण्याची दुरावस्था अशा परिस्थितीचा सामना पोलिसांना करावा लागत असल्याची बाब मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे येथील १३९ निवासस्थानांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत रासनेंनी पोलीस वसाहत पुनर्वसन करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

मामलेदार कचेरीच्या बांधकामाकरिता २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसच्या काळात हा प्रकल्प संथ गतीने राहिला. या भागात दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे शहर तहसीलदार कार्यालय, उमाजी नाईक स्मारक, खडक पोलीस स्टेशन अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. परंतु त्या ठिकाणी नागरिकांना बसण्याकरता कोणतीही व्यवस्था नाही नसून खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्व्हरबद्दल कायम तक्रारी असतात, तसेच कार्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा अरुंद असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर येथील कामाला गती द्यावी, अशी मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आशीर्वाद देत विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आज विधानसभेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा संबंधित चर्चेत बोलत असताना आपल्या संरक्षणासाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांच्या खडक भागातील वसाहतीचे पुनर्वसन… pic.twitter.com/I8PxP9Obn8

— Hemant Rasane (@HemantNRasane) December 19, 2024

दरम्यान, सभागृहात बोलताना आमदार रासनेंनी सर्वप्रथम बहुमताने विजयी करणाऱ्या कसब्यातील जनतेचे ऋण व्यक्त केले. तसेच कसबा मतदारसंघात आमदार राहिलेले दिवंगत गिरीश बापट, अरविंद लेले, अण्णा जोशी, मुक्ता टिळक, वसंतराव थोरात, उल्हास काळोखे या सर्वांना आदरांजली समर्पित केली. सभागृहात पहिल्यांदाच बोलत असताना दिवंगत आमदारांची आठवण काढणारे हेमंत रासने एकमेव आमदार असल्याचे पहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

-मोहोळ कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कार्यकर्त्याला आणखी काय हवं’

-चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या

-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार

-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान

Tags: bjphemant rasanePolice Colonypuneपुणेपोलीस वसाहतभाजपहेमंत रासने
Previous Post

ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Tamhini Ghat Bus Accident

मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी

Recommended

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

March 13, 2024
Supriya Sule

बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’

August 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved