Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”

by News Desk
March 13, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी जोमाने तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची लढाई म्हणजे बारामती लोकसभेची निवडणूक. या मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षांत एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या रुपाने जवळपास एकांगी निवडणूक पाहायला मिळाली.

येत्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत वेगळी रंगत पहायला मिळणार आहे. मात्र अशातच आता ही तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरुद्ध दंड थोपटले आहेत. ‘बारामतीमधून आपण निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार’, असा निर्धार विजय शिवतारे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला. पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती. पण मी त्यांना माफ केलं आहे. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो. पण तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांच्या उर्मटपणावर बारामती मतदारसंघात लोक म्हणाले की, ‘अजित पवार उर्मट आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मत देणार नाही, सुप्रिया सुळेंना मत देणार. काही लोकांचं म्हणणं आहे एका बाजूला लांडगा आणि एका बाजूला वाघ आहे आम्ही मत कसं देऊ असा मतदारांचा प्रश्न आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

“एखाद्याने चूक केली तर त्याला पश्चात्ताप तरी असतो. पण यांना तो पश्चात्तापही नाही. जणूकाही लोकांना फसवणे हा जन्मजात अधिकार असल्यासारखे हे वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे”, अशी टीका विजय शिवतारे यांनी यावेळी केली.

“२०१९च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरुद्ध केलेला प्रचार राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी तेव्हा आजारी होतो. त्यामुळे रुग्णवाहिकेत माझा पूर्ण प्रचार झाला. पण अजित पवारांनी तेव्हा म्हटलं की मरायला लागला आहात तर कशाला निवडणूक लढवताय? माझी गाडी कुणाची आहे, कुठल्या कंपनीची आहे वगैरे चौकशी करेपर्यंत अजित पवार खालच्या स्तरावर उतरले”, असंही शिवतारे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला

-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार

-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक

-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’

-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती

Tags: ajit pawarBaramatibjpEknath ShindeLoksabha ElectionncpSupriya SuleVijay Shivtareअजित पवारएकनाथ शिंदेबारामतीभाजपराष्ट्रवादीलोकसभा निवडणूकविजय शिवतारेसुप्रिया सुळे
Previous Post

पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला

Next Post

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? 'आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू', अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

Recommended

Gopinath Munde

…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड

December 12, 2024
Pune Traffic

पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल

May 12, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved