Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘नितेश राणेंनी मुस्लीम समाजाची माफी मागावी’; रिपब्लिकन पक्षाची मागणी

by News Desk
September 7, 2024
in Pune, राजकारण
Nitesh Rane and Parshuram Wadekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी आहे तर एकीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष.. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तसेच मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावरुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी नितेश राणेंनी मुस्लिम समाजाची माफी मागवी, अशी मागणी केली आहे.

‘नितेश राणे हे सातत्याने सामाजिक समतोल बिघडेल अशी बेताल वक्तव्य करत आहेत. मुस्लिमांना मस्जिदीत जाऊन ‘चुन चुन के मारेंगे’, ‘पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत’ या सारख्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, एका सांविधानिक पद्धतीने निवडून आलेल्या आमदाराच्या तोंडी अशी हिंसक भाषा शोभत नाही, आम्ही त्यांच्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध करतो, तसेच  राणे यांनी भविष्यात अशी प्रक्षोभक वक्तव्य करू नये आणि मुस्लिम समाजाची माफी मागावी’, अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

‘…तर आम्ही मुस्लीम समाजाच्या संरक्षणासाठी पुढे येणार’

“शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी  महाराष्ट्र आहे. अलीकडे राज्यातील काही नेते जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम समाजात दुही निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही वक्तव्ये करण्यात येत आहेत याचा परिणाम महायुतीमधील आमच्यासारख्या सहयोगी पक्षांना बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संविधान बदलाच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील महायुतीच्या मतांवर झाल्याचे दिसते. रिपब्लिकन पक्ष भारतीय संविधानाला मानणारा आणि धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देणारा आहे. सामाजिक सलोखा राखण्यास नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे. एखाद्या नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणाने समाजातील एखाद्या घटकाला असुरक्षित वाटत असेल तर त्या समाजाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव पुढे राहू. राणे यांनी  मशीदमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी पुढे येणार”

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू – मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी करू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सक्त ताकीद द्यावी तसेच अन्य नेत्यांना  आणि संतांना सुद्धा बेताल, हिंसक प्रक्षोभक वक्तव्य करू नयेत अशी समज द्यावी अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘उन्माद दाखवत असाल तर…’; अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना इशारा

-श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक; सिंहरथ अन् ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत

-Pune: लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन; भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था कशी असेल?

-प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

-काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?

Tags: bjpMuslimNitesh RaneParshuram WadekarRPIनितेश राणेपरशुराम वाडेकरभाजपमुस्लिमरिपाई
Previous Post

‘उन्माद दाखवत असाल तर…’; अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना इशारा

Next Post

ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊ रंगारी बाप्पा जल्लोषात विराजमान; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Bhausaheb Rangari

ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊ रंगारी बाप्पा जल्लोषात विराजमान; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ

Recommended

तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार

तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार

February 23, 2024
Pimpri Corporation

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

April 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved