Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात ठाकरेसेनेला दुय्यम स्थान, निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट; हडपसर अन् कसब्यात बसणार फटका

by News Desk
October 25, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Mahadev Babar, Vishal Dhanwade Shivsena
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून अनेक मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवारींची यादी जाहीर झाली. पुण्यात काँग्रेसकडून कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर तर शरद पवार गटाकडून वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे आणि हडपसरमधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहरात ठाकरेसेनेला केवळ एकच जागा मिळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची लाट निर्माण होऊ लागली आहे. कसब्यातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली उद्विग्नता मांडली आहे.

महाविकास आघाडीमध्ये वडगाव शेरी आणि हडपसरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले. त्यामुळे हडपसरमधील स्थानिक नेते आणि माजी आमदार महादेव बाबर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. थेट बंडाचं निशाण फडकवत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाकरे सेनेकडे असणाऱ्या कोथरुड मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे कोथरुडमध्ये आयात उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

कधीकाळी पुणे शहरात शिवसेनेचे ३ आमदार होते. परंतु महाविकास आघाडीत केवळ एक जागा ठाकरेंच्या पदरी पडली आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.  ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक कमालीचे नाराज झाल्याचे चित्र असून आता याचाच फटका पुणे शहरात  महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कसब्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पोस्ट करत “बाळासाहेब होते तेव्हा पुण्यात शशिकांत सुतार, दीपक पायगुडे, विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे कित्येक आमदार होते. मुलांना उपाशी ठेऊन हसत रहा म्हणणे कितपत योग्य आहे? शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. बाकी सगळे नंतर. प्रत्येक गोष्ट सहन करायची असेल तर मग शिवसैनिक आणि गुलाम यात काय फरक आहे, एकनिष्ठ होतो राहणार परंतु अन्याय सहन करणे हे गुलामीचे लक्षण आहे. उद्धव साहेब जो आदेश देणार तेच आम्ही करणार.” असं म्हंटलंं आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

कसब्यात बसणार शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका?

विशाल धनवडे यांच्यासह पल्लवी जावळे या कसबा मतदारसंघातून पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. युवा नेते आदित्य ठाकरे यांची रॅली कसब्यात गेम चेंजर ठरली होती. परंतु आता होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे सेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याने धनवडे यांच्यासह जावळे या नाराज आहेत. याचा फटका काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक

-विधानसभा निवडणूक: मावळमध्ये १७ लाखांची रोकड जप्त; इतका पैसा येतोय कुठून?

-बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन

-अमित शहा याला दारात तरी उभं करतील का?; भरणेंच्या प्रचारसभेतून अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

-पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?

Tags: HadpsarKasbaMahadev BabarshivsenaUddhav ThackerayVishal Dhanwadeउद्धव ठाकरेकसबाविशाल धनवडेशिवसेनाहडपसर
Previous Post

चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक

Next Post

महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?

महायुतीत चेतन तुपेंच्या उमेदवारीने हडपसरचं राजकारण तापलं; महाविकास आघाडीचं काय?

Recommended

“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे

“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे

March 19, 2024
BJP FLag

जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली

September 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved