Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’

by News Desk
October 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Chandrakant Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटीलांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. कोथरूड परिसरातील सोसायट्यांमधील मतदारांशी संवाद साधून चंद्रकांत पाटील हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. कोथरूडमध्ये विरोधी पक्षांतर्फे कोण उमेदवार, हे निश्चित होण्यापूर्वीच चंद्रकांतदादांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचले.

चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत जो जनसागर उसळला होता, तो पाहता कोथरूडमधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत, पुढील २० दिवस चंद्रकांत पाटलांसाठी, त्यांच्या विजयासाठी देण्याचे सर्वांनी निश्चित केले असल्याचे दिसत आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी

चंद्रकांत पाटलांच्या पदयात्रांचा किंवा प्रचाराचा सहज कानोसा घेतला तर सोसायट्यांच्या समस्या सोडवत असतानाच, त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कोथरूड मतदारसंघामध्ये प्रचाराचा पहिला टप्पा चंद्रकांत दादांनी धुमधडाक्यात सुरू केला असून कोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांमधून संपर्क साधत आणि तेथील नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पौड रस्ता या परिसरातील सोसायट्यांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात सुरुवात केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळणार हे पूर्वीचे निश्चित झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. याउलट विरोधकांतर्फे कोण, हा घोळ आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरूच होते. उमेदवार शोधणे, त्याला सक्रिय करणे ही विरोधकांची मोठी मोहीम ठळकपणे दिसून आली. हा मतदारसंघ भाजपकडे राहणार आणि चंद्रकांत पाटील हेच उमेदवार असणार, हे आधीच ठरल्यामुळे भाजपच्या प्रचाराचे सूत्र आधीच निश्चित झाले होते आणि त्यानुरूप प्रचाराला सुरुवातही झाली आहे. भाजप आणि संघ परिवाराचे त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, झटून कामाला लागले असून अतिशय सूक्ष्म नियोजन, प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम यांची आखणी झाली आहे. त्याप्रमाणे गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.

२४ तास उपलब्ध असणारा आमदार

चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघात अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे, असे मत कोथरूडकर व्यक्त करताना दिसतात. आधी प्रदेशाध्यक्ष असताना किंवा नंतर मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील केव्हाही उपलब्ध असल्याची भावना, त्याचप्रमाणे संकटकाळी धावून जाणारा आमचा नेता असल्याचे अनेक जण बोलून दाखवतात. सुशिक्षित, उच्चभ्रू त्याचप्रमाणे काही गोरगरीब जनतेचा बनलेला हा मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क ठेवला असल्यामुळे त्यांचे स्वागत ‘आपल्या घरातील उमेदवार’ असल्यासारखे सर्वत्र होत आहे, हाच त्यांचा ‘कोथरूड पॅटर्न’ त्यांना विजयश्रीकडे घेऊन जाणार असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणाऱ्या चंद्रकांत पाटलांबद्दल प्रचंड जिव्हाळा तर आहेच. पण वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेल्या योजनादेखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा आणि एकात्मतेचा निर्णय होणार आहे, त्यासाठी राज्यामध्ये ‘महायुती’ ची सत्ता येणे आवश्यक आहे, आणि म्हणूनच चंद्रकांत पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलून दाखवतात. गेल्या आठवड्याभरात चंद्रकांत दादांनी कोथरूड परिसरातील गाठीभेटींमध्ये प्रामुख्याने पक्षांतर्गत असंतुष्टांच्या भेटी, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, जाहिरात क्षेत्रातील बुजूर्ग, अध्यात्मिक संस्था, प्रख्यात व्यावसायिक, कलाक्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संपर्क साधला आणि सर्वत्र त्यांचे आपुलकीने स्वागत झाले. कोथरूडमध्ये एकूणच भगवे वातावरण तयार झाले असून चंद्रकांत पाटलांचा दांडगा व्यासंग त्यांना नक्कीच यशस्वी करून जाणार असल्याचे बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया

-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले

-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा

-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट

Tags: bjpChandrakant PatilKothrudKothrud Patternकोथरुडकोथरुड पॅटर्नचंद्रकांत पाटीलभाजप
Previous Post

“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया

Next Post

‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
Sunil Shelke Maval Pattern

'मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार"; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा

Recommended

पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…

पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…

July 28, 2024
Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद

Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद

August 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved