पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची २ महिन्यापूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली. या हत्येचा मुख्य सूत्रधार सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर हे दोघे असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मोहिनी आणि अक्षय जावळकर या दोघांनी सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केला, हत्येपूर्वी रेकी केली असल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे.
मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघे २०१३ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. पुढे मोहिनी यांच्या मुलाला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळून देण्याच्या कारणातून दोघे आणखी जास्त संपर्कात आले. २०१३ ते २०१७ पर्यंत अक्षय हा मोहिनी हिच्याच घरी झोपायला असायचा. मात्र, २०१७ मध्ये सतीश यांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला. तेव्हापासून अक्षयने मोहिनीचे घर सोडून दुसरीकडे राहायला गेला. मात्र, तरीही दोघांचे अनैतिक संबंध सुरूच होते.
मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती. घरातील दहा रुपये देखील खर्च करण्याचा अधिकार मोहिनीला नव्हता. त्यामुळे काही करून सतीश यांचा काटा काढण्याचे मोहिनी अक्षय याला सांगत होती. अक्षय आणि मोहिनी या दोघांनी विचार पक्का केल्यानंतर त्यांनी सतीश यांचा काटा काढण्याची योजना आखली. सतीश वाघ यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून १५ पंधरा मिनिटांतच तब्बल ७२ वार करून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला.
सतीश वाघ यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या ६ जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली
-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?
-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?
-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला
-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…