Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली

by News Desk
March 13, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Deepak Mankar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावरुन काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर धंगेकरांच्या शिवसेनेत येण्याने महायुतीमध्ये देखील वादाचा भडका उडाल्याचे पहायला मिळत आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर आधी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील टीका करताना धंगेकरांची कुंडलीच काढली आहे.

‘आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं असल्याचं सांगितलं जात होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं’, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी पक्षप्रवेशानंतर अजित पवारांवर केली होती. यावरुन आता अजित पवार गटाने धंगेकरांच्या टिकेला उत्तर देताना त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

काय म्हणाले दीपक मानकर?

‘धंगेकर स्वतः ४ दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आले, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असा इशारा दिपक मानकरांनी रवींद्र धंगेकरांना दिला आहे.

‘पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची, हप्ते वसूल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायची. लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशनकडून बांधकामाला परवानगी घेवून सगळी सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे, वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली’, असे अनेक आरोप करत मानकरांनी धंगेकरांची कुंडली माध्यमांसमोर मांडली आहे.

“केलेली पापे इथेच फेडायची आहेत”

‘लाचलुचपत खात्यात त्यांच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा या पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतात. दादांनी त्यांना दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहेत’, अशा तिखट शब्दात मानकरांनी धंगेकरांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?

-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?

-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला

-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…

-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध

Tags: ajit pawarCongressdeepak mankarKasbaRavindra DhangekarShiv SenaWaqf Boardअजित पवारकसबाकाँग्रेसदीपक मानकररवींद्र धंगेकरवक्फ बोर्डशिवसेना
Previous Post

स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?

Next Post

आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Mohini Wagh

आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

Recommended

Pune BJP

भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?

April 19, 2025
”हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे’- नितेश राणे

”हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे’- नितेश राणे

May 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved