पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस हात सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेने प्रवेश केला. ३ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास असणाऱ्या धंगेकरांचा दारुन पराभव झाला. धंगेकर चर्चेत राहण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असायचे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे ते काहीसे थंडावल्याचे पहायला मिळाले होते. धंगेकर गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. त्यानंतर अखेर ३ दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘धंगेकर काय होतास तू?… काय झालास तू…’ असे म्हणत टीका केली. तर शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी तर थेट ‘पुण्याचा वाल्मिक कराड’ म्हणत सडकून टीका केली. एकीकडे धंगेकरांवर टीकांचं सत्र सुरु आहे तर दुसरीकडे धंगेकर समर्थकांना विधान परिषद आमदारकीचे वेध लागल्याचे पहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकरांचा दारुन पराभव झाला. विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढल्यानंतर धंगेकरांनी आता शिंदेसेनेचा वाट धरली आहे. पक्षप्रवेश होताच धंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनर झळकले आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील शिंदेगटातील कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. पण आता ‘कसब्यात जनतेच्या मनातील आमदार’ अशा मजकुराचे बॅनर काही उत्साही कार्यकर्त्यांनी लावल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी होताना दिसत आहे.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाविकास आघाडीच नाही तर महायुतीतील नेत्यांनी देखील धंगेकरांवर टीका केल्याचे पहायला मिळाले आहे. धंगेकरांच्या पक्षप्रवेशाला पहिल्यांदा भाजप आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला होता. तसेच पक्षप्रवेशावर बोलताना धंगेकरांनी अर्थमंत्री अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी धंगेकारांच्या कारनाम्यांची कुंडलीच माध्यमांसमोर मांडल्याचे पहायला मिळाले.
‘धंगेकर स्वतः ४ दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आले, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असा इशारा दिपक मानकरांनी रवींद्र धंगेकरांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली
-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?
-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?
-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला