Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय

by News Desk
April 5, 2025
in Pune, पुणे शहर
Dinanath Hospital
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासापोटी एका महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या कारभार सर्वांसमोर आल्यानंतर शहरात चांगलंच वातावरण तापलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं नाव मोठं अन् लक्षण खोटं हे स्पष्ट झालं. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिला लग्नानंतर तब्बल ८ वर्षांनी मूल होणार त्यामुळे ती खूष होती. मात्र, रुग्णालायाच्या या कारभाराने तिच्या आनंदावर विरजण टाकलं. शुक्रवारी संपूर्ण दिवस रुग्णालायाविरोधात राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. सोशल मीडियावर देखील रुग्णालयाची चांगलीच बदनामी झाली. एक निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती आल्याचे पहायला मिळाले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी रुग्णालयाची भूमिका मांडतानाच रुग्णांच्या दृष्टीने एक सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. आजपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतले जाणार नाही, असे पत्र डॉ. केळकर  यांनी जारी केले आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरी डिपार्टमेंट आलेला असो, लहान मुलांच्या विभागातला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत ठेवून वाटचाल करण्यात आली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती. पण कालांतराने यात बदल झाला. तनिषा भिसे प्रकरणी सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

कालचा दिवस ‘दीनानाथ’च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे, असेही या पत्रात केळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया

-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक

-दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चुकी असल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करेल’

-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”

-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण

Tags: Dinanath Mangeshkar HospitalDr. KelkarLata Mangeshkarpuneडॉ. केळकरदीनानाथ मंगेशकर रुग्णालयपुणेलता मंगेशकर
Previous Post

‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया

Next Post

मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या ‘हाय लेव्हल कमिटी’चा सरकारला अहवाल सादर, दीनानाथ रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Hospital

मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या 'हाय लेव्हल कमिटी'चा सरकारला अहवाल सादर, दीनानाथ रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर

Recommended

“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”

“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”

April 26, 2024
डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…

July 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved