Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रुग्णांकडून लाखोंचे बिल घेणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने थकवली कोट्यवधीचा कर, नेमका आकडा किती?

by News Desk
April 5, 2025
in Pune, पुणे शहर
Dinanath Mangeshkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्याचे नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत आहेत. नुकतीच तनिषा भिसे मृत्यू झाल्याची घटना घडली अन् दीनानाथ रुग्णालयाविरोधात आक्रमक आंदोलने सुरु झाली. त्यातच आता दीनानाथ रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा २०१९ पासूनचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याचे समोर आले आहे.

गेल्या ६ वर्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरला नाही. रुगणालयाने थकवलेला पालिकेचा कर हा थोडका नसून तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने सन २०१९ पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे २७ कोटींची थकबाकी दाखविली आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून रुग्णांना वंचित राहायला लागू नये या करिता शासनातर्फे महात्मा फुले आरोग्य योजना राबवली जाते. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘महात्मा फुले आरोग्य योजने’चा लाभच मिळत नसल्याची देखील धक्कादायक बाब आता समोर आली आहे. मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिले आहे की, ‘महात्मा फुले योजनेचा लाभ येथे मिळत नाही.’ परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेत “सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. रुग्णालयात रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याने या रुग्णालयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परशुराम हिंदू सेवा संघ तक्रार करणार आहे.

त्यामुळे, आता पुणे महापालिका थकवलेला कर पालिका वसूल करणार का? आणि परशूराम हिंदू सेवा संघाने मुख्यमंत्र्यांकडे या रुग्णालयाची महात्मा फुले योजनेसंदर्भात तक्रार केल्यास या रुग्णालयावर कारवाई केली जाणार का?, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक

-मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या ‘हाय लेव्हल कमिटी’चा सरकारला अहवाल सादर, दीनानाथ रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर

-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय

-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया

-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक

Tags: CorporationDinanath Mangeshkar HospitalLata Mangeshkar Medical FoundationMahatma Phulepuneदीनानाथ मंगेशकर रुग्णालयपुणेपुणे महापालिकामहात्मा फुले योजनालता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन
Previous Post

‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक

Next Post

आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Dinanath Hospital

आधी चिल्लर फेकली आता शेण फासणार; दीनानाथ रुग्णालयाविरोधात आंदोलक आक्रमक

Recommended

Election Commission

पुणे जिल्ह्यात २१ दिवसात मतदार संख्येत लाखोंनी झाली वाढ; आकडेवारी आली समोर

August 29, 2024
अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली

विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या गर्जे आणि विटेकर या दोन्ही उमेदवारांचा विजय; अजित पवारांची प्रतिक्रिया

July 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved