पुणे : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील आणि अधिकारी आणि हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुणे पोलिसांनी महत्वाच्या ४ सूचना लॉज मालकांना दिल्या आहेत. त्यापैकीच ‘लॉजमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा’ अशी महत्त्वाची सूचना पोलिसांनी लॉजचे मालक- चालक यांना केली आहे.
लॉजवर राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत. लॉजमध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात या अंतर्गत येणाऱ्या सर्व लॉज च्या मालक आणि चालक यांच्यासोबत काल आम्ही बैठक घेतली. या बैठकीत आम्ही त्यांना काही मार्गदर्शक सूचना जर त्यांनी पाळणा बंधनकारक आहे याबाबत माहिती दिली. त्यांच्या लॉज मध्ये येणारे सर्व नागरिकांची कागदपत्र तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा तसेच परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबद्दल सुद्धा त्यांचे सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट सोबत असलेला विजा याची पडताळणी करून घेतल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल याची खात्री करावी.”, अशी माहिती पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-वेळेच्या आधीच अजित दादांनी केलं उद्घाटन, मेधा कुलकर्णींची नाराजी
-PMRDA: हजारो शेतकऱ्यांची फसवणूक अन् ३ हजार कोटींचा घोटाळा? विकास आराखड्याचे गौडबंगाल काय?
-पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
-सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा