Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर, भटकंती
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील २१ वर्षीय महिलेचा राजगड किल्ल्यावरून खाली कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (वय २१, रा. आळंदी) असे मृत महिलेचे नाव आहे. कोमल आणि तिचे पती गुरुवारी राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून कोमल सुमारे ४०० फूट खाली कोसळली. यामध्ये तिच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर जखमा झाल्या आणि जोरदार रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुपारी पडलेल्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. कोमल आणि तिचे पती सायंकाळी किल्ला उतरत असताना ही दुर्घटना घडली. कोमल संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायथ्याशी असलेल्या कड्यावर आपटली. खडकावर आदळल्याने तिच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात आणि रामभाऊ ढेबे यांनी कोमल यांचा मृतदेह गडावरील पद्मावती माचीवरील राजसदरेच्या प्रांगणात आणला.

You might also like

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू पथकाने तातडीने राजगड गाठला. पोलिस अंमलदार पी.एच. सुर्यवंशी, स्थानिक पोलीस पाटील विश्वास शिर्के, पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे आणि हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले यांनी रात्री उशिरा कोमल यांचा मृतदेह खाली आणला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वेल्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजगडावरील खडतर आणि निसरड्या वाटांमुळे पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दुर्घटनेने किल्ल्यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

-१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

-PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

Tags: puneRajgad Fortपुणेराजगड किल्ला
Previous Post

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

Next Post

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

News Desk

Related Posts

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

by News Desk
June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

by News Desk
June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

by News Desk
June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
Next Post
Mulshi Patern

पुण्यात पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्...

Please login to join discussion

Recommended

चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून

चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून

April 16, 2024
मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा

August 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Ravindra dhangekar
Pune

पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक

June 7, 2025
चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved