Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

by News Desk
June 4, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Sharad Pawar And Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहरात सध्या भाजपचाच बोलबाला पहायला मिळत आहे. अशातच पुणे शहर हळूहळू भाजपचा बालेकिल्ला बनत चालले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते आणि कार्यकर्ते असे मत व्यक्त करत आहेत की, ‘जर भाजपचा हा गड भेदायचा असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांनीही एकत्र येणे गरजेचे आहे.’

२०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत प्रचंड यश मिळवले होते. त्यावेळी भाजपला १०० नगरसेवक मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांसह दुसरे स्थान मिळाले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. या विजयासह भाजपने राष्ट्रवादीच्या हातातील महापालिकेची सत्ता हिसकावून घेतली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

यंदा पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पुण्यातील भाजपची ताकद वाढल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्यात मोठा विजय मिळवला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही पुण्यातील सहापैकी सहा जागा जिंकल्या. यामुळे भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत, पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत एकमत आहे. महायुतीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसत आहे.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येण्याची गरज वाटते. काही नेते हेच मत उघडपणे मांडताना दिसत आहे. तर काही खासगीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. अशातच पुण्यात लावण्यात आलेल्या काही बॅनर्सची देखील चांगलीच चर्चा रंगली.

राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी लावलेल्या बॅनरवर अजित पवार आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो आहेत. त्यावर “पुणे महानगरपालिका आपल्याकडे हवी असेल, तर हे दोघे एकत्र हवेत” असा मजकूर आहे.निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री हवी आहे. त्यामुळे भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी टक्कर देण्यासाठी जास्तीत जास्त ताकद एकवटण्याच्या दृष्टिकोनातून, दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावे, अशी मागणी काही कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

-विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

-पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

Tags: ajit pawarBannersncppunesharad pawarअजित पवारपुणेबॅनरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

Next Post

पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

Recommended

“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”

March 22, 2024
‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

अजित पवारांचे कार्यकर्त्यांना संकेत, दादांनी सांगून टाकलं निडणुका कधी होणार?

July 14, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved