पुणे | मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी एक मोठा पुष्पक एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान ८ ते १० प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या अपघाताची चौकशी सुरू आहे. हा अपघात सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडल्याने रेल्वे स्थानकांवर प्रचंड गोंधळ उडाला.
‘गाडीतील प्रचंड गर्दीमुळे हा अपघात घडला असावा’, असे मध्य रेल्वेच्या म्हणणे आहे. प्रवासी दरवाज्याजवळ लटकलेले होते, आणि काहींच्या मते, दोन गाड्यांमधील प्रवाशांच्या पिशव्या एकमेकांना धडकल्याने प्रवासी खाली पडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या घटनेबाबत पोस्ट करुन रेल्वे प्रशासनाला चांगलंच फटकारलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2025
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; दादांनी पुन्हा काकांशेजारी बसणं टाळलं
-राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना काका-पुतण्याचे एकत्रित फोटो; पुण्यातील बॅनरची तुफान चर्चा
-‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ आजपासून सुरु; पहा तिकीटाचे दर किती?
-मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् निवासी डॉक्टरने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?
-काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा; पुण्यात मोठी राजकीय घडामोड