पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात दाखल झालेल्या या नेत्यांनी पक्षाशी असलेली बांधिलकी तोडल्याचा आरोप आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या यशानंतर अजित गव्हाणे यांच्यासह २८ जणांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गव्हाणे यांनी शरद पवार गटापासून अंतर राखले आणि कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पक्षात परतण्याची ऑफर दिल्याने त्यांच्या स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
सोमवारी तुषार कामठे यांनी गव्हाणे आणि लांडे यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. पक्षाने त्यांना संधी आणि विधानसभेचे तिकीट दिले होते, परंतु त्यांनी पक्षाशी बेईमानी केल्याचा आरोप कामठे यांनी केला. निवडणुकीनंतरही या नेत्यांनी पक्षात सक्रिय राहणे अपेक्षित होते, परंतु ते दुसऱ्या गटाच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या फलकांवर त्यांचे फोटो झळकले होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे कामठे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
-फडणवीसांसोबत फोटो अन् ‘नेतृत्व दमदार’चा नारा; बिडकरांच्या स्टेट्समुळे भाजपमध्ये धुरळा
-धीरुभाई अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘काय बोलायचं ते…’
-माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर
-अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?