Tuesday, August 5, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

by News Desk
June 19, 2025
in Pune, महाराष्ट्र, राजकारण
नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी अलीकडेच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यावर आघोरी पूजेचा आरोप केला होता. मोरेंच्या आरोपाला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “वसंत मोरे कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांना ओळखत नसल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. राणेंच्या या टीकेला मोरेंनी चांगलंच मनावर घेतलं असून, त्यांनी आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला आहे.

काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर पक्षात फूट पडण्यास कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उज्जैन येथील बगलामुखी देवीच्या मंदिरात अघोरी पूजा केल्याचा दावा केला. मोरे यांनी यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यामध्ये नितेश राणेंनी उडी घेत मोरेंवर शरसंधाण साधलं आहे.

You might also like

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना वसंत मोरे यांना ओळखत नसल्याचे सांगितले. पत्रकारांनी त्यांना मोरे यांची ओळख सांगितली असता, राणे यांनी “ते आता कुठे आहेत?” असा प्रतिप्रश्न केला. यावर संतापलेल्या मोरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला. व्हिडिओची सुरुवात राणेंच्या प्रश्नाने आणि शेवट राणे व मोरे यांच्या भेटीच्या दृश्याने केला आहे.

वसंत मोरे याबाबत बोलताना म्हणाले की, “साहेब आम्ही गरिब शेतकऱ्या घरची लेकरं…आम्ही राजकारणात येताना आमच्या मागे ना कुणाचा वसा होता ना कुणाचा वारसा घेऊन आम्ही जन्मलो…, आम्ही आमचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही पुढाऱ्याने ओळखू दे अथवा ना ओळखू दे आमची मायबाप जनता आम्हाला ओळखते हीच आमच्या कामाची पावती…,” असे वसंत मोरे यांनी ठामपणे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

-पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन

-‘मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय’, महेश लांडगेंनी घेतला अजितदादांशी पंगा

-महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल, पालिकेच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग

Tags: bjpNitesh RanepuneUddhav ThackerayVasant Moreनितेश राणेपुणेवसंत मोरे
Previous Post

‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

Next Post

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

News Desk

Related Posts

Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

by News Desk
August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

by News Desk
August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

by News Desk
August 3, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
Next Post
Dheeraj Ghate

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?

Recommended

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

May 14, 2024
पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या

पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या

June 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025
‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक
Pune

‘तुम्ही रां**, तुमची जात….’, पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण; ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे आक्रमक

August 3, 2025
रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार
Pune

रेड बर्ड ट्रेनिंग: बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका; भाजप युवा मोर्चाची मंत्री मुरलीधर मोहोळांकडे तक्रार

August 3, 2025
फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved