पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकारी ओंकार कदमसह काही कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेध्याक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला. आताच यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
अर्थात,आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला.
आताचं यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 25, 2025
दरम्यान, सत्ताधारी पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून देखील अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने आता राज्यात महिलांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटनांवरुन विरोधकांकडून तसेच सामाजिक संघटनांकडून टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी
-माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर, अजित पवारांचा दणदणीत विजय
-पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी
-लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला
-शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद