पुणे : महाराष्ट्रातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे ओळखली जातात. विशेषतः पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. मात्र, येथील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात होणारी पाण्याची समस्या नेहमीच चर्चेत असते. हिंजवडीतील वाहतूक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकदा बैठका झाल्या, तरीही कायमस्वरूपी तोडगा अद्याप सापडलेला नाही.
आता सरकारने हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. यानुसार, डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत सर्व पायाभूत सुविधांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खड्ड्यांच्या समस्येवर प्राधान्याने लक्ष दिले जाईल, तसेच मेट्रोचे कामही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनात हिंजवडीच्या समस्यांचा मुद्दा विधिमंडळात गाजला होता. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क परिसरात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पाण्याच्या समस्येवर उपाय सुचवणारा अहवाल सादर करेल. तसेच, ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिका यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीनंतर आमदार महेश लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधत या चर्चेची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक
-आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा
-पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर