Monday, August 11, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

by News Desk
August 11, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या संघटनशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळवलं. आता पुणे महानगरपालिका निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी पक्षाने ‘एक पान – एक कार्यकर्ता’ या रणनीतीवर आधारित जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप मंडल अध्यक्षांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरला.

या दौऱ्यात पुण्याच्या मंडल अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्याशी थेट संवाद साधला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या भेटीत स्थानिक निवडणुकांबाबत मंडल अध्यक्षांनी आपला अभिप्राय मांडला.

You might also like

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

अमित शहा यांनी या भेटीत कार्यकर्त्यांना मतदार यादीतील प्रत्येक पानावर (पन्ना) नियुक्त असलेल्या कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवण्याचा सल्ला दिला. “भाजपचे खरे बळ हे त्याचे कार्यकर्ते आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यश हे केवळ रणनीतीचे फळ नसून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे परिणाम आहे,” असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. “भाजप नेहमीच निवडणूक मोडमध्ये असतो. आम्ही विजय किंवा पराभव बाजूला ठेवून आकडेवारी आणि प्रत्यक्ष फीडबॅकवर आधारित रणनीती आखतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंडल अध्यक्षांच्या अनुभवांवर आधारित चर्चा आणि प्रश्नोत्तर सत्र या भेटीचे वैशिष्ट्य ठरले.

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाला सलाम केला. “भाजपमध्ये मोठ्या नेत्यांइतकेच मंडल कार्यकर्त्यांना महत्त्व आहे. हेच पक्षाचे वेगळेपण आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. सुसंवाद आणि संघटनशक्ती हीच भाजपची ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा दौरा केवळ औपचारिक भेट न राहता, राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. संसद अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय नेत्यांनी पुण्यातील मंडल अध्यक्षांसाठी वेळ काढला, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील विश्वासाचे द्योतक आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, “महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना पक्ष संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि थेट संवादातून दिशा निश्चित करणे, हे या दौऱ्याचे उद्दिष्ट होते.” या दौऱ्यातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची भाजपची परंपरा पुन्हा एकदा समोर आली. संसदेत पुण्यातील मंडल अध्यक्षांनी राष्ट्रीय नेत्यांसमोर आपले विचार, शंका आणि मत निर्भयपणे मांडली. यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप अधिक शिस्तबद्ध आणि तयार असल्याचे स्पष्ट दिसते.

महत्वाच्या बातम्या

-कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

-स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

-धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

-कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

-प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

Tags: Amit ShahChhagan BhujbalLocal body ElectionMurlidhar Moholpuneअमित शहाजे. पी. नड्डापुणे महापालिका निवडणूकमुरलीधर मोहोळ
Previous Post

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

News Desk

Related Posts

Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

by News Desk
August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

by News Desk
August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

by News Desk
August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

by News Desk
August 6, 2025
Please login to join discussion

Recommended

Hemant Rasane

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

November 18, 2024
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”

‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा

July 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

August 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved