Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”

by News Desk
March 21, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली राज्याचं राजकारण बदललं. त्यातच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात लढण्याचा विडा उचलला आहे. या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात दौरे करुन पवार घराण्यावर टीका केली आहे. यावरुन आता महायुतीमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहे.

‘पवार कुटुंबानं पुण्यात कोणत्याही नेत्याला मोठं होऊ दिलं नाही. बारामतीचा सातबारा काय पवारांच्या नावावर आहे का? बारामतीची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच. अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे’, अशा शब्दांत गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारेंनी थेट अजित पवारांवर आगपाखड करताना दिसत आहेत.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार म्हणजे काका-पुतण्या आमनेसामने भिडताना दिसत आहेत. बारामतीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं. त्यातच शिवतारेंनी बारामतीमधून अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.

विजय शिवतारे यांनी २ दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यानंतरही बारामती उमेदवारीबाबत शिवतारे ठाम आहेत. शिवतारे यांच्या रुपात अजित पवार यांच्या विरोधात महायुतीतूनच मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यावरुन अजित पवार गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिंदेंच्या सेनेला निर्णावाणीचा इशारा दिला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शिवतारे बारामती मतदारसंघात फिरुन वातावरण खराब करत आहेत. याचा अर्थ शिंदेंचं त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण नाही. शिवतारे महायुतीचा धर्म तोडत राहिले, तर शिवसेनेचा शिंदे गट ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये लढणार आहे, त्या त्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील महायुतीचा धर्म तोडू शकतात”, असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी दिला आहे.

“शिवतारेंकडून वारंवार अजित पवारांविरोधात टीकांचं सत्र सुरू आहे. महायुतीमधील वातावरण खराब होईल, असं कृत्य आम्हाला करायचं नाही. पण शिवतारेंच्या कृतीमुळे शिंदेंचे आदेश त्यांचेच नेते ऐकत नसल्याचा संदेश राज्यात जात आहे. पुरंदरच्या जनतेनं २०१९ मध्ये त्यांची जागा दाखवली आहे”, असंही आनंद परांजपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”

-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया

-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण

-दिलीप मोहितेंची तलवार म्यान! आढळराव पाटलांचा प्रचार करण्याचीही तयारी; मुंबईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना

Tags: ajit pawarBaramatiChief Minister Eknath ShindeLok Sabha ElectionsSupriya SuleVijay Shivtareअजित पवारबारामतीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेलोकसभा निवडणूकविजय शिवतारेसुप्रिया सुळे
Previous Post

“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”

Next Post

मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’

मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; 'बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही'

Recommended

Eye Care

तुमच्याही डोळ्यांचे आरोग्य बिघडलेय का? मग ‘या’ ७ गोष्टींचा आहारात करा समावेश

December 12, 2024
Sharad Pawar and MNS

ऐन विधानसभेच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

August 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved