Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?

by News Desk
April 2, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामराम केला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली मात्र वसंत मोरे यांना काही उमेदवारी मिळण्याची उमेद नाही मिळाली. वसंत मोरे यांनी मराठा आंदोलक समितीकडे देखील आपला मोर्चा वळवला होता. मात्र तिथेही सूत न जुळल्याने मोरे वंचितच्या वाटेने निघाले.

पुणे लोकसभा निवडणुकीत वेगळा प्रयोग करुन दाखवणार म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना अखेर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘मोरेंनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल’, असं धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आज अखेर याबाबतच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

वसंत मोरे यांच्या रुपाने वंचितने पुण्यात तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. यापूर्वी वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहारा म्हणून ओळखले जात होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित-एमआयएम आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली. याचा अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांना पराभवाचा झटका बसला.  त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वंचित आघाडीने अशीच कामगिरी केल्यास पुण्यात वसंत मोरे हे भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना अडचणीचं ठरु शकतं.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. pic.twitter.com/a1Gx2b9nKg

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024

सध्याच्या घडीला पुणे मतदारसंघात मोहोळ आणि धंगेकरांचे पारडे जड दिसत आहे. मात्र आता वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पुणे लोकसभा निवडणुकीत काय चित्र असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मोरेंसाठी प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात सभा घेतल्यास दलित मतदार मोरे यांच्या पाठिशी उभा राहण्याची शक्यता आहे.

माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय..!

बदल घडणार…वसंत फुलणार…!#पुणे_की_पसंत_मोरे_वसंत pic.twitter.com/mhd0XmAvE1

— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 2, 2024

दरम्यान, वसंत मोरे हे सोशल मीडियावर नेहमी अ‌ॅक्टीव्ह असतात. तसेच मोरेंचा मोठा चाहतावर्ग आहे. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे बालाजीनगरपासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे मोहोळ आणि धंगेकर यांच्यासमोर निश्चितच मोठं आव्हान असू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

-Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?

-Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार

-‘आम्ही दडपशाही नाही, लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे

-“विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे” -मुरलीधर मोहोळ

-Pune Lok Sabha | ‘मोरेंना पाठिंबा देण्यापेक्षा पक्षाचा उमेदवार द्या’; वंचितच्या नेत्यांचाही मोरेंना विरोध

Tags: BaramatibjpCongressMahavikas AghadiMahhayutiMurlidhar MoholPune Loksabha ElecstionRavindra DhangekarSupriya SuleVanchit Bahujan AaghadiVasant Moreकाँग्रेसपुणे लोकसभा निवडणूकबारामतीभाजपमहायुतीमहाविकास आघाडीमुरलीधर मोहोळरवींद्र धंगेकरवंचित बहुजन आघाडीवसंत मोरेसुप्रिया सुळे
Previous Post

Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार

Next Post

Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा

Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा

Recommended

पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू

पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू

June 12, 2024
‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

May 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved