Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस

by News Desk
May 6, 2024
in Entertainment, Pune, पुणे शहर, राजकारण
‘लोक त्यांना बोलवतात, सत्कार करतात, हार घालतात अन् मग विचारतात, ५ वर्षे कुठे होतात?’- देवेंद्र फडणवीस
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी फडणवीसांनी शिरुर भागाचा विकास विकास होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

‘देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले 15 वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल’, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘महेश दादा असो किंवा आढळराव पाटील असो. त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी खुप प्रयत्न केलेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी काहीचं झालं नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री असतांना तो प्रश्न मार्गी लावला. सरकार आलं आणि बैलगाडी शर्यंत सुरू केली. असं म्हणत शेतकऱ्यांना काय हवंय, सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढळराव पाटील आहे’, असेही फडणवीस म्हणाले.

‘जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेने देखील आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग मी काढला. जागा जरी राष्ट्रवादीला गेली तर उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ असं दोघांना सांगितलं. तिथे पक्ष बदलला नाही. आम्ही एका विचाराने सोबत आलो आहोत. याआधी पालघरमध्ये आम्ही ठाकरेंना उमेदवारही दिला आणि जागी ही दिला. त्यानंतर तो उमेदवार देखील आम्ही निवडून आणला. एका विचारात काम करत असतांना आम्ही पक्ष बदलला नाही. त्याठिकाणी आम्ही ठरवून केलं आहे’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्या चांगलाच समाचार घेतला. “शिवाजीराव आढळराव पाटलांवर पक्ष बदलण्याचा आरोप केला जात आहे. परंतु विरोधकांकडून टीका होत असेल तर समोरच्या उमेदवारांनी किती पक्ष बदलला. किती निष्ठा जपली. गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते? आता कसे थांबले? याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

“आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे एका गोष्टीत ते सरस आहेत. आढळराव पाटील नाटककार नाहीत. त्यांना नाटक जमत नाहीत.  अमोल कोल्हेंना नाटक जमतं, रडता येतं. हसता येतं. बोलता येतं चुगलेबाजी करता येतं. असं म्हणत लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा बघायला जातात. परंतु नाटक जर फ्लॉप झालं तर लोक परत जात नाहीत, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.

दरम्यान, पाच वर्ष हा व्यक्ती मतदारसंघात फिरकला नाहीत. आता ते गावात जातात. त्यावेळी लोक शिव्या वगैरे देत नाहीत. त्यांना बोलवतात. सत्कार करतात. हार घालतात. मग विचारतात पाच वर्षे कुठे होते?ही निवडणूक देशाची असून आढळराव सारखा एक व्यक्ती मोदींसोबत ज्यावेळी जाईल. त्यावेळी आपल्या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…

-आमदार होताच धंगेकरांनी लाटली वफ्फ बोर्डाची जमीन? MIM उमेदवाराच्या आरोपाने खळबळ, वाचा नेमकं प्रकरण काय?

-Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

-श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्या

-बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार

Tags: Amol KolhebjpDevendra FadnavisLok Sabha ElectionShirurShivajirao Adharao Patilअमोल कोल्हेदेवेंद्र फडणवीसभाजपलोकसभा निवडणूकशिरुरशिवाजीराव आढळराव पाटील
Previous Post

सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…

Next Post

‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…

'ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस'; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा...

Recommended

लोकसभेच्या मतदानापूर्वी धंगेकरांना मोठा धक्का! मुस्लिम नागरिकांच्या मागणीवर आला मोठा निर्णय, अडचणी वाढणार?

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?

September 5, 2024
पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

April 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved