Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आमदार होताच धंगेकरांनी लाटली वफ्फ बोर्डाची जमीन? MIM उमेदवाराच्या आरोपाने खळबळ, वाचा नेमकं प्रकरण काय?

by News Desk
May 6, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
आमदार होताच धंगेकरांनी लाटली वफ्फ बोर्डाची जमीन? MIM उमेदवाराच्या आरोपाने खळबळ, वाचा नेमकं प्रकरण काय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात १३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून जोरदार यंत्रणा राबवली जात आहे. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांच स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. यामध्येच आता सुंडके यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुस्लिम वक्फ बोडीची मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हताशी धरून संगनमताने बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्‌सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी- व्यावसायिक इमारत बांधली जात असल्याचा आरोपही सुंडके यांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, असा आरोपही सुंडके यांनी केला आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्याजवळ सर्व्हे नंबर 966 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्‌याचा अंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (2023) मार्पच-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेंडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आल्याच सुंडके यांनी सांगितलं आहे.

लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणाऱ्या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाची देन असते. गरीब, मागास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनीच वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बड्या महापालिका अधिकाऱ्याशी संगनमत करून बळकावला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमता परत करायला हवी, अशी मागणी देखील सुंडके यांनी केली आहे.

दरम्यान, अनिस सुंडके यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने राजकीय वर्तुळात याबद्दलची चर्चा चांगलीच रंगली आहे. एका बाजूला मुस्लिम समाज हा काँग्रेसच्या बाजूने राहील, असा दावा नेत्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे पक्षाचे उमेदवार धंगेकर यांनी मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वफ्फ बोर्डाची जमीन लाटल्याचा आरोप झाल्याने त्यांची अडचण वाढताना दिसत आहे. आता रवींद्र धंगेकर या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

-श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्या

-बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार

-मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

-“आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडतात, ते फक्त खोटं बोलण्यातच पटाईत”; अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या निशाण्यावर

Tags: AMIMAnis SundkebjpCongressLok Sabha Electionmla ravindra dhangekarpuneअनिस सुंडकेआमदार रवींद्र धंगेकरएएमआयएमकाँग्रेसपुणेभाजपालोकसभा निवडणूक
Previous Post

Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?

Next Post

सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…

सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा...

Recommended

Pune

माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य

February 22, 2025
शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुणे ड्रग्ज रॅकेट: दिल्लीत अटक केलेल्या ३ आरोपींना रात्री पुण्याला आणलं

February 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved