Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मोदींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा, पण विरोधकांच्या इंजिनात मात्र…’; पुण्यातील प्रचारसभेत फडणवीसांची बोचरी टीका

by News Desk
May 10, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘मोदींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा, पण विरोधकांच्या इंजिनात मात्र…’; पुण्यातील प्रचारसभेत फडणवीसांची बोचरी टीका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बाणेर आणि पर्वती भागामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, गणेश बिडकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

‘गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच १० वर्षांत चांदणी चौकातील पुल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आल्या. तर सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले असून पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले’ असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणेकरांचा एकच निर्धार, पुन्हा एकदा आपलं मोदी सरकार !!!

माझे मार्गदर्शक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पर्वती विधानसभा मतदारसंघात माझ्या प्रचारार्थ भव्य-दिव्य जाहीर सभा पार पडली. प्रचंड संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पंतप्रधान… pic.twitter.com/jLM6b24q4g

— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) May 9, 2024

‘२०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन प्रकल्प पुण्यात येतील आणि पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठी तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मतदानावेळी मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे’, असे आवाहन देखील फडणवीसांनी केले आहे.

‘१४० कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. ‘सबका साथ सबका विकास’ नरेंद्र मोदी करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला विरोधकांच्या इंजिनात फक्त कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या इंजिनात सर्वसामान्यांना देखील जागा आहे’, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील

-मुस्लिमांची जमीन वाचवली त्यांनाच पाठिंबा; अनिस सुंडकेंसाठी एकवटले मुस्लिम धर्मगुरू

-नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल अखेर लागला; दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता

-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा

-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?

Tags: bjpCongressDevendra FadnavisLok Sabha ElectionsMuralidhar Moholpuneकाँग्रेसदेवेंद्र फडणवीसपुणेभाजपमुरलीधर मोहोळलोकसभा निवडणूक
Previous Post

“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील

Next Post

‘काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मोदींची ऑफर

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
“होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण…” शरद पवारांचे मोदींना खरमरीत उत्तर

'काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या'; शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मोदींची ऑफर

Recommended

‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा

‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा

April 14, 2024
राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved